Available Treatments

Advantages for

laser in Piles, Fistula & Fissure

  • Fast Recovery
  •  Minimal Pain Minimal invasive 
  • Minimum Blood Loss
  • Minimal Recurrence
  • No Loss of Control

laser in Piles, Fistula & Fissure

  • कमीत-कमी ६ तास पूर्णतः उपाशी पोटी यावे
  • पाणी , चहा , गुटखा, बिडी, तंबाखू व सिगारेट सुद्धा घेऊ नये.
  • जवळच्या किमान एका सज्ञान नातेवाईकाचे सोबत असणे आवश्यक आहे.
  • उच्च रक्तदाब (ब्लडप्रेशर) व थायराइडच्या रुग्णांनी संबधित औषधाचा सकाळचा डोस असल्यास सकाळी सातच्या आधी अगदी थोड्या पाण्यासोबत घ्यावे.
  • मधुमेह (डायबेटीस) च्या रुग्णांनी उपचाराच्या दिवशी संबंधित औषधे घेऊ नये.
  • रक्त, लघवी इ. तपासणीचे व सध्याच्या आणि इतर कुठल्याही आजाराची रिपोर्ट, फाईल व चालू असलेली औषधे (असल्यावर ) सोबत आणावित.
Are You Suffering From....

Diseases Treated

गुदद्वार म्हणजे मलद्वाराभोवती काहीही झाले की, सर्वसामान्य माणसांना वाटते की आपल्याला मुळव्याधच झाला आहे, पण मुळव्याध हा एकच व्याधी होत नसून अनेक प्रकारच्या व्याधी असू शकतात त्याबद्दल थोडक्यात माहिती देत आहोत.

1. मुळव्याध (Piles) : अर्श, पाईल्स, कोंब, चुंभळ : मलप्रवृत्तीनंतर थेंब थेंब रक्त पडणे किंवा रक्ताची चिरकांडी उडणे अथवा रक्ताची धार लागणे, शौचाच्या वेळेस मांसल गोल आकाराचा भाग बाहेर येणे व शौचानंतर परत आत जाणे किंवा कालांतराने आत जाणे किंवा तसेच बाहेर राहणे किंवा बाहेर आलेला मांसल भाग हाताने मध्ये ढकलावा लागणे व कपड्याला रक्ताचे डाग पडणे अथवा चिकट स्त्राव लागणे.

2. भगंदर, नासूर  (Fistula) : शौचाच्या जागेवर आजुबाजूला गाठ येणे, सुज येणे,गाठेत पू तयार होणे व गाठ फुटल्यावर बरे वाटणे / नेहमी गाठ निर्माण होणे व फुटणे, सतत चिकट स्त्राव व रक्त पू मिश्रित स्त्राव होणे.

3. फिशर, परिकर्तिका  (Fissure) : शौचाच्या वेळेस व शौचाच्यानंतर भरपूर प्रमाणात आग होणे, वेदना होणे. ठणका लागणे किंवा टोचल्यासारखे वाटणे. कातरल्याप्रमाणे वेदना होणे व थेंब थेंब रक्त पडणे.

4- गुदार्बुद   (Rectal Polyps) : लहान मुलांमध्ये हा आजार होतो. यामध्ये शौच करतेवेळी लालभडक गोल आकाराचा कोंब येतो, रक्तस्त्राव होतो. शौचनंतर कोंब बोटाने गुदद्वारामध्ये आत लोटावे लागते.

5. गुदकंडू, (Pruritus – Ani / Fungal Infection) : अखंड कमी अधिक प्रमाणात वारंवार खाज येणे, व रात्री जास्त खाज येणे.

6. नाडीव्रण (Pilonidal Sinus) : माकड हाडाजवळ बेंड निर्माण होणे व जखमेतून लांब लांब केस निघणे, सतत पू वाहणे

7. गुदभ्रंश (Prolapse Of Rectum) : मलाशय बाहेर येणे, (विशेषत: लहान मुलांमध्ये तसेच मोठ्या व्यक्ती मध्ये.

8. गुदविद्रधि  (Perianal Absscess) : गुदद्वाराजवळ किंवा गुदद्वारात फोड येतो व वेदना होतात. काही दिवसानंतर फोड फुटतो व त्यातुन रक्‍त व पू स्त्राव येते त्यावेळी वेदना कमी होतात.

9. जामखीळ  (Anal Warts) : शौचाच्या आजुबाजुला जामखिळसारखे फोड येणे, त्वचा वाढणे.

10. Sentinal Piles: शौचाच्या जागी बाहेरच्या बाजूला कोंब हाताला लागणे.
11. मलावष्टंभ  (Constipation): संडासला साफ न होणे, कडक संडासला होणे, जोर द्यावा लागणे

12. Thrombosed Cyst :  रक्त गोठून अचानक गाठ निर्माण होणे व वेदना जास्त होणे.

13. कॅन्सर  (Cancer) : शौचाच्या जागी आतमध्ये गाठ / गाठी तयार होवून कॅन्सरपर्यंत त्यांची अवस्था जाणे. शौचाच्या जागेवाटे गॅस बाहेर पडतांना वेदना होणे किंवा गॅस बाहेर पडण्यासाठी कुंथावे लागणे.
वरील पैकी कोणतेही लक्षण आढळल्यास आपण डॉक्टरांना भेटावे व आजारापासून मुक्त व्हाव

Don't Be affraid

उपचारानंतर

उपचारानंतर सुरुवातीचे काही दिवस वेदना व रक्तस्त्राव होणे स्वाभाविक व अपेक्षित आहे. विशेषत: शौचानंतर अर्थात हा सगळा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक / गरजेची सर्व औषधी दिलेली असतात. परंतु त्यामुळे त्रास पुर्णपणे बंद होऊ शकत नाही. दुखण्याची । वेदनेची तीव्रता ही रुग्णाचे वय, आजारांचे प्रमाण, त्याची शारीरिक व मानसिक स्थिती तसेच दुखणे सहन करण्याची सहनशक्ती यावर ही अवलंबून असते. त्यामुळे एकाच आजाराच्या उपचारदरम्यान होणारा त्रास व आजार बरा होण्यासाठी लागणारा कालावधी हा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे रुग्णांनी एकमेकांच्या आजाराचा होणारा त्रास, कालावधी व लागणारा खर्च इ. तुलना करू नये. बहुतांशी रुग्ण उपचारानंतर दहा दिवसांच्या आतच आपल्या नियमीत दिनचर्येस सुरवात करतात, पण हे सर्व रुग्णांना लागू होत नाही. या गोष्टी देखील रुग्णाचे वय, आजाराचे प्रमाण, रुग्णाची सहनशक्ती, तसेच शारिरीक व मानसिक स्थिती यावर अवलंबून असते. उपचारानंतर खाण्यापिण्या संबंधी दिलेल्या सूचना व पथ्य पाळले तर आजार लवकर बरा होऊ शकतो. पथ्य पाळले गेले नाही तर आजार पुन्हा बळावला जाण्याची शक्‍यता असते, अशा वेळेस परत उपचार करावे लागू शकतात.

Follow Following Rules

पथ्यापथ्य- Diet should be followed carefully

Mixed fruits with apple banana orange and other on wooden background - Healthy food style
  • उपाशी पोटी औषधी घेऊ नये.
  • मल व मूत्र यांचा वेग रोखून धरू नये किंवा बळजबरी कुंथू नये.
  • दुपारी / रात्री जेवणानंतर लगेच झोपू नये.
  • सकाळी शौचाहून आल्यावर लगेच कोमट पाण्यात बसावे व पाण्यातून उठल्यावर जागा स्वच्छ पुसून मलम लावावा. संध्याकाळी पुन्हा एकदा वरील प्रमाणे करावे .
  • पंधरा दिवस मोटारसायकल । स्कूटर इ. वाहनावर बसू नये. दूरचा प्रवास टाळावा .
  • खाऊ नये : मसाल्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, जास्त तिखट, जास्त गोड, दही,
    मटन, मासे, अंडी, बाजरी, दारू, बिडी, गुटखा, सिगारेट, तंबाखु, शिळे अन्न इत्यादी पदार्थांचे सेवन करू नये .
  • जेवणात  : दूध तूप, ताक, फळे, पालेभाज्या, सुरण, गाजर, काकडी, टोमॅटो, मुग, दुधी, तोंडली, ज्वारी, गहू इ. चा वापर जास्त करावा.
  • 1 ग्लास दूध + ४ चमचे गावरान तूप रोज सकाळी घ्यावे .